शिवतीर्थावर दसरा मेळावा ठाकरेंचाच!
माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:
१. शिंदे गटाचे आमदार श्री. सदा सरवणकर यांचा अंतरिम अर्ज फेटाळला, सरवणकर यांना या खटल्यात सहभागी होण्याचा 'लोकस' नाही हा ठाकरे गटाचा युक्तिवाद कोर्टाला मान्य.
२. खरी शिवसेना कोणाची या प्रश्नात जायला कोर्टाचा स्पष्ट नकार (त्यासंबंधीत युक्तिवाद सुरू ठेवणाऱ्या सरवणकर यांच्या वकिलाला सुनावणीदरम्यान कोर्टाने फटकारले).
३. ठाकरेंना परवानगी नाकारण्याचा निर्णय हा खोडसाळ असल्याचे कोर्टाचे मत.
४. कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी बतावणी करून ठाकरेंना परवानगी नाकारणे हा स्पष्टपणे सत्तेचा दुरुपयोग असल्याचा कोर्टाचा पालिका प्रशासनावर ठपका.
५. पालिका प्रशासनाने केलेला सत्तेचा दुरुपयोग लक्षात घेता कोर्टाला या प्रकरणात हस्तक्षेप करणे आवश्यक वाटत असल्याचा स्पष्ट इशारा,
त्या अनुषंगाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यास कोर्टाची परवानगी. कोर्टाचा आदेश अंमलात येण्यासाठी पोलीस परवानगीचे सोपस्कार पूर्ण केले जावेत असा कोर्टाचा स्पष्ट निर्देश.
(सदर आदेश, युक्तिवाद आणि एकंदर प्रकरणाबद्दल वाचण्यासाठी लिंक पुढे दिली आहे)