Thread Reader
Tweet

लीलावती भागवत ( ५ सप्टेंबर १९२१ - २५ नोव्हेंबर २०१३) फास्टर फेणे चे जनक भा रा भागवतांच्या पत्नी.   बाल व कुमार ह्यांच्यासाठी केलेल्या लेखनासाठी मुख्यतः ख्यातनाम असलेल्या भागवत पति-पत्नींनी जीवनभर इतरही विपुल लेखन केले. मुंबई आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. #पुस्तकआणिबरचकाही 👇

‘मराठी बालसाहित्य: प्रवाह आणि स्वरूप’ (१९९५) हा त्यांचा बालसाहित्यासंबंधीचा सांगोपांग विवरण करणारा ग्रंथ महत्त्वाचा आहे. भा.रा.भागवत यांच्या विविधढंगी चुरचुरीत साहित्याचे संपादन त्यांनी ‘भाराभर गवत’ (१९८८) या ग्रंथात केले असून त्यांच्या विनोदी व खुसखुशीत लेखन-प्रवृत्तचे दर्शन 👇
मार्मिक परंतु जिव्हाळ्याने घडविले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांपैकी ‘स्पर्शवेली’, ‘छाया झालीसे प्रकाश’, ‘हुंकार’, ‘मा निषाद’ व ‘घरटं’ या उल्लेखनीय आहेत. ‘जे नेत्री साठविले’ या प्रवासवर्णनाबरोबरच ‘पांढरा चाफा’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक अत्यंत मनोवेधक आहे. हिंदी कथासम्राट 👇
प्रेमचंद यांच्या काही कथांचा मराठी अनुवाद करून लीलावतींनी मराठी साहित्यात भर घालण्याची कामगिरी केली आहे. बाल साहित्य संस्था निर्मितीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.लीलाताईनी बालांसाठी व कुमारांसाठी कविता, कथा व कादंबरी असे प्रचुर लेखन केले आहे.( संदर्भ - महाराष्ट्र नायक)
प्रविण कलंत्री
जाती न पुछो साधू की, पुछ लिजीये ज्ञान,, मोल करो तलवार का, पडा रहे दो म्यान! वाचन वेडा !!
Follow on 𝕏
Missing some tweets in this thread? Or failed to load images or videos? You can try to .