Thread Reader
Twitter

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर : (२५ नोव्हेंबर १८७२ - २६ ऑगस्ट १९४८). एक श्रेष्ठ मराठी नाटककार, संपादक, राजकीय प्रश्नांचे चिकित्सक, अध्यात्मवादी. त्यांनी अध्यात्मपर लेखन केलेल असले, तरी साहित्याच्या क्षेत्रात ते नाटककार व पत्रकार म्हणूनच मुख्यत: प्रसिद्ध आहेत. #पुस्तकआणिबरचकाही 👇

त्यांच्या महत्त्वाच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह खाडिलकरांचा लेखसंग्रह (भाग १ व २, १९४९) प्रसिद्ध असून पहिल्या महायुद्धावरील त्यांच्या लेखमालेचे पाच भाग आहेत. शिवाय कांचनगड ची मोहना, कीचक वध, संगीत मानापमान, संगीत स्वयंवर, अशी पंधरा नाटके ही त्यांच्या नावावर आहेत. 👇
मराठी रंगभूमीच्या आणि मराठी नाट्यवाङ्‌मयाच्या इतिहासात खाडिलकर नावाला अनन्यसाधारण स्थान आहे. खाडिलकरांच्या लेखणीमुळे मराठी गद्य आणि संगीत रंगभूमीला खरा वैभवाचा काळ लाभला. खाडिलकरांची नाट्यप्रतिभा सदैव इतिहासकाळात व पुराणकाळात रमली. त्या काळातील व्यक्ती आणि घटना यांत दडलेल्या 👇
प्रभावी नाट्याने तिला सतत आकर्षून घेतले. त्याचा तिने वर्तमानाच्या संदर्भात अर्थ लावला. भूताचा अर्थ वर्तमानाच्या संदर्भात लावणे, भूताचे वर्तमानाशी असणारे नाते व्यक्त करणे हा सदर प्रतिभेचा सहजधर्मच होता. त्यांच्या साहित्यातले नाट्य जेवढा भूतकालीन घटनांवर प्रकाश टाकते, तेवढाच 👇
वर्तमानकालीन घटनांचा अर्थ लावते, स्वाभाविकच कर्झनशाहीचे खरे स्वरूप प्रगट करू पाहणाऱ्या  कीचकवध नाटकाच्या प्रयोगावर १९१० साली इंग्रज सरकारने बंदी घातली आणि ते जप्त केले. १९०७ च्या तिसऱ्या व १९१७ च्या पुणे येथील नाट्य संमेलनाचे ही ते अध्यक्ष होते. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)
प्रविण कलंत्री
जाती न पुछो साधू की, पुछ लिजीये ज्ञान,, मोल करो तलवार का, पडा रहे दो म्यान! वाचन वेडा !!
Follow on Twitter
Missing some tweets in this thread? Or failed to load images or videos? You can try to .